Home Breaking News भारतीय बौद्ध महासभेच्या बैठकीसाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – गडपाळे

भारतीय बौद्ध महासभेच्या बैठकीसाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – गडपाळे

108

दाऊ गाडगेवाड हिमायतनगर प्रतिनिधी /-

भारतरत्न, विश्वरत्न, बौधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकारणीचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपल्याने नुतन कार्यकारणी स्थापन करावयाची असून तालुकाध्यक्ष प्रताप लोकडे यांच्या

अध्यक्षतेखाली संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता दैनिक दलाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. आंबेडकर यांच्या आदेशानुसार नुतन कार्यकारणीची निवड करून पुढील ध्येय धोरणे आखण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून मातृसंस्थेच्या महिला कार्यकारणीची सुद्धा स्थापना करायची आहे. त्या अनुषंगाने

तालुक्यातील बौद्धाचार्य, शहराचे, वार्डाचे, ग्राम शाखेचे पदाधिकारी यांच्यासह बौद्ध उपासक, उपासिका यांनी मोठ्या संख्येने दि. १ सप्टेबर २०२४ रोजी नालंदा बुद्ध विहार आंबेडकर नगर हिमायतनगर येथे ठिक ११ वाजता उपस्थित राहावे असे आवाहन तालुका सरचिटणीस सुरेश गडपाळे यांनी केले आहे.

यावेळी सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, डॉ. हरिष रावलीया, तालुकाध्यक्ष प्रताप लोकडे, जिल्हाध्यक्ष न्यायमूर्ती यशवंतराव चावरे, रविकिरण जोंधळे, ज्योतीताई कुंटे, सा. ना. भालेराव, कुसुमताई गव्हारे, ए. एस. जाधव, विजयमाला नरवाडे, सुभाष नरवाडे, अप्पाराव येरेकार याच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.